marathi Latest bhajan -नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी भजन लिरिक्स – Naam Vitthal Vitthal Gheu Abhang Marathi Bhajan lyrics- या मराठी भजनाचे बोल व्हिडिओसह खाली दिले आहेत. तुम्हाला ते आवडेल.

नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी भजन लिरिक्स
चला मंगळ वेढे पाहू … (2)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)….||धृ.||
वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती…
ती कथा मुखाने गाऊ… (२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)…||१||
भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी…
आदराने सुमने वाहू… (२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)…||२||
कान्होपात्रेच्या गुरूस्थानी,
आनंद मुनी महाज्ञानी…
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ… (२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ… (३)…||३||